
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत मालिकेत सुरु आहे शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची धामधूम.

कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीय.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाच्या हजेरीत केळवण पार पडल्यानंतर आता हळदीसाठीही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत.

शशांक अपूर्वाच्या हळदीला वैशाली सामंत, आदर्श शिंदे आणि ‘फुलाला सुगंध माती’चा मालिकेतील कीर्ती खास हजेरी लावणार आहेत.

हळद म्हण्टलं की नाचगाणं हे ओघाने आलंच.

वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या सुपरहिट गाण्याने हळदीच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे.

जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा.

दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम.

कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे.

लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं.

एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.

(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)