
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि खूप प्रसिद्धी मिळवली. यातील अनेक जण असे होते की ते अभिनेता होण्यापूर्वी सरकारी नोकरी करत असत. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी या सेलिब्रिटींनी सरकारी नोकरी सोडली. जाणून घ्या या कलाकारांची नावे.

रजनीकांत हे कर्नाटक रोडवेजमध्ये बस कंडक्टर होते.

देव आनंद सेन्सॉर बोर्डात क्लर्क होते.

शिवाजी साटम यांनी सरकारी बँकेतील कॅशियरची नोकरी सोडून अभिनयात हात आजमावला.

अमरीश पुरी हे विमा महामंडळात लिपिक होते.

अमोल पालेकर हा बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते.

बलराज साहनी हे सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक होते.

राजकुमार हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर होते.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी औंध पुण्यात मिलिटरी कॅन्टीन चालवली पण नंतर त्यांनी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. (फोटो संग्रहित – इंडियन एक्सप्रेस)