
‘खतरो के खिलाडी १०’ या रिऍलिटी शो ची विजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

करिश्मा गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

येत्या ५ फेब्रुवारीला करिष्मा तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

करिष्मा आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन आहे. एका कॉमन फ्रेंडद्वारे करिश्मा आणि वरुणची ओळख झाली होती.

त्यांचे बाहेर फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

करिष्मा आणि वरुणने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता. आता ५ फेब्रुवारीला दोघे मुंबईत लग्न करणार आहेत.

करिश्माने आपल्या लग्नासाठी कांजीवरम साडी घेतल्याचीही माहिती आहे.

करिष्मा गुजराथी आणि वरुण कर्नाटकातील बंगळुर येथील आहे. त्यामुळे गुजराथी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. (सर्व फोटो सौजन्य : करिष्मा तन्ना/ इन्स्टाग्राम)