
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ देणारा रोहित आजही ‘रॉक स्टार’ म्हणून ओळखला जातो. हा लिटिल चॅम्प बघता-बघता कधी मोठा झाला कळलंच नाही.
आता रोहित राऊत लग्न बंधनात अडकणार आहे.
तो गर्लफ्रेंड जुईली जोगळेकरशी लग्न करणार आहे.
रविवारी २३ जानेवारी ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
पण रोहितची होणारी पत्नी जुईली कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जुईली ही देखील एक गायिका आहे.
ती ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये सहभागी झाली होती.
या शोच्या माध्यमातून तिने अनेकांच्या मनावर जादू केली होती.
जुईली आणि रोहित गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
रोहितने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षावर केला होता.