दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हमसा नंदिनी हिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. नंदिनीला ग्रेड ३ चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. -
हमसाला याबाबतची माहिती मिळताच तिला जबरदस्त धक्का बसला. पण कर्करोग झाला असतानाही ती याकडे सकारात्मक पद्धतीने बघत आहे.
-
हमसा सध्या केमोथेरपीद्वारे यावर उपचार करत आहे. यासाठी तिला डोक्यावर केस काढून टाकावे लागले आहे.
-
हमसाने केमोथेरपीदरम्यान टक्कल करावे लागले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे हमसा नंदिनीही तिच्या या लूकमध्ये एक अॅड शूट केली आहे. यात ती फारच खास दिसत आहे.
-
हमसाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी भारतीय पोशाखात एक फोटोशूट केले आहे. सध्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
हमसा ही या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तिने जरी टक्कल केलेल्या लूकमध्ये फोटोशूट केले असले तरी ती यात फार स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिश अमी पटेलने हमसाचा हा फोटो शेअर केला आहे.
-
हा फोटो शेअर करताना ती म्हणाली, तू फार छान दिसत आहेस. हे चित्र सामर्थ्य, सौंदर्य आणि कृपा दर्शवते. कर्करोगाशी तुमची लढाई हा या प्रवासाचा एक भाग आहे. मला माहित आहे की तू हे जिंकून अधिक सुंदर दिसशील. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.
-
हमसाच्या या फोटोवर मनीष मल्होत्राने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. लोकांनी हमसाच्या फोटोला सुंदर आणि ग्लॅमरस म्हटले आहे.
-
हमसा तिची कर्करोगाची लढाई धैर्याने आणि प्रेमाने लढत आहे.
-
विशेष म्हणजे हमसाने टक्कल केलेल्या लूकमधील तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
हमसाचे चाहते ती लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे.
-
‘आयुष्यात माझ्या मार्गात कितीही अडचणी आल्या, कितीही विश्वासघात वाटला तरी मी बळी पडणार नाही. मी भीती, नकारात्मकता आणि निराशा माझ्यावर राज्य करू देणार नाही, मी हार मानणार नाही’, असे तिने तिच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
हमसा तेलुगू चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
हमसाने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. तिने अभिनेता नागार्जुनसोबतही स्क्रीन शेअर केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीची स्तनाच्या कर्करोगाशी झुंज, टक्कल केलेल्या स्थितीत जाहिरातीसाठी केलेले फोटोशूट चर्चेत
ती तिची कर्करोगाची लढाई धैर्याने आणि प्रेमाने लढत आहे.
Web Title: South indian actor hamsa nandini breaks barriers with an inspiring bald photoshoot amid cancer battle nrp