
‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्स फेम महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकरचा विवाह सोहळा पार पडला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती.
अखेर २३ जानेवारीला या दोघांनी लग्न केलं.
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रोहित-जुईलीचा लग्नसोहळा पार पडला.
रोहित-जुईलीच्या लग्नातील खास क्षण..
रोहित आणि जुईलीने लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्याचे, विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
जुईली नव्या पिढीची युवा गायिका आहे.
गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत.
या लग्न समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली.
रोहित आणि जुईलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
(सर्व फोटो सौजन्य : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर / इन्स्टाग्राम)