
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच बिग बॉसमधून अभिजित बिचुकले बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर अभिजितने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानविरोधात संताप व्यक्त केला.

खरतरं अभिजीत बिचुकलेने वाईल्ड कार्ड एण्ट्री करत बिग बॉसच्या घरात आला होता. आता बाहेर आल्यानंतर अभिजीत म्हणाला, त्याला बाहेर येऊन २४ तास झाले आहेत. तर तो कुटुंबाला भेटण्यासाठी साताऱ्याला आला आहे.

पुढे बिग बॉसमधला त्याचा अनुभव सांगत अभिजीत म्हणाला, धमाल, राग, लोभ अशा सर्व गोष्टींचा आनंद घेत तो खेळला आहे.

अभिजीत त्याच्या एक्झीट विषयी बोलत म्हणाला, तो जेव्हा बाहेर पडण्याचा विचार करत होता. तेव्हा बिग बॉसने त्याल्या विनंती करुन थांबवलं होतं. आता त्यांच्या नियमानुसार तो बाहेर आला आहे.

तर त्याच्या मनात काही शंका आहेत. त्या सगळ्या गोष्टी तो पत्रकार परिषदेत सांगणार आहे.

तर पुढे सलमान विषयी बोलताना अभिजीत म्हणाला, संपूर्ण जगाने पाहिलं की त्याच्यावर काही लोक जाणीवपूर्वक आरोप केले होते. बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांसोबत याच कारणामुळे त्याचे भांडण झाले.

पुढे त्याने शिवी दिली त्याविषयी अभिजीत म्हणाला, त्याने जी शिवी दिली ते जगजाहीर आहे.

पुढे अभिजीत म्हणाला, “सलमान खानला माझा मत्सर निर्माण झाला. त्याला कोणी मोठं झालेलं पहावत नाही. त्याचा इतिहास पाहा. माझं कौतुक झालेलं त्याला पहावलं नाही. त्याला वाटतं की तोच शो चालवतो.

पुढे तो म्हणाला, त्याने १४ सीझन चालवले असतील, पण माझं आव्हान आहे की हा सीझन मी चालवणार. सलमान खान कमी पडला म्हणून त्याचा मत्सर जागा झाला आणि माझ्यावर चिडला. त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. कारण आत असताना त्याने जी भाषा वापरली ना ती भाषा माझ्यासोबत महाराष्ट्रात कोणीही वापरली नाही. वाघ पिंजऱ्यात होता म्हणून तो चाबूक फिरवत होता. पण आता वाघ बाहेर येतोय”.

पुढे सलमान विषयी बोलताना अभिजीत म्हणाला, “मी शिवी दिल्यानंतर त्याचा बाऊ करण्यात आला. नंतर सलमान खान नावाची जी कोणी व्यक्ती आहे तो स्वत:ला काय समजतो माहिती नाही.

पण त्याला अजून अभिजीत बिचुकले काय हे कळलं नाहीये. महाराष्ट्रातील नेत्यांना अभिजीत बिचुकले कोण हे माहिती आहे. सलमान खान अजून अंड्यात आहे, अजून अंड्याबाहेर यायचं आहे.

“सलमानला कळेल अभिजीत बिचुकले कोण आहे ते आणि कोणाशी पंगा घेतोय. त्याला काय ते दिल्लीतून आलेले गायक वैगेरे वाटलो का ? मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातील गादीचा वैचारिक वारस आहे.”

“शाहू, फुले, आंबेडकरांना मानणारा मी आहे. असे १०० सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

अभिजीत बिग बॉसमध्ये असताना अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे देवोलीना भट्टाचार्यसोबत असलेला किस हे प्रकरण झाले.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वभावामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. ‘माझ्यासमोर पंतप्रधानही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही,’ अशी कमेंट अभिजीतने केली होती.