
छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री मौनी रॉय विवाहबंधनात अडकली आहे.

मौनीने प्रियकर सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली.

गेल्या कित्येक दिवसांपासून मौनी तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत होती.

मौनी आणि सुरज यांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने झाले आहे.

मौनीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डल आहे.

मौनीने सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

अत्यंत साधा मेकअप करुनदेखील मौनीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मौनी आणि सुरजचा विवाहसोहळा पार पडला.

मौनी आणि सुरजच्या लग्नातील खास क्षण….

गेल्या काही वर्षांपासून मौनी आणि सुरज एकमेकांना डेट करत आहेत.

अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

मौनीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.

(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)