
बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सने कलाविश्वात पदार्पण करण्याआधी आपले मूळ नाव बदलल्याचे तुम्ही ऐकले असेलच. अभिनेत्यांप्रमाणेच काही रॅपर्सने देखील नाव बदलून प्रसिद्धी मिळवली आहे.

पंजाबी सिंगर जे स्टार हा लोकप्रिय रॅपर्सपैकी एक आहे. त्याचं मूळ नाव ‘जगदीप सिंह’ असं आहे.

‘जिन्हें मेरा दिल लुटेया’ या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळालेला पंजाबी सिंगर आणि रॅपर जेझी बी याने सुद्धा आपलं मूळ नाव बदललं आहे. ‘जसविंदर सिंह बेन्स’ असं त्याच खरं नाव आहे.

‘काबील’ चित्रपटातील ‘हसीनो का दिवाना’ असो अथवा ‘दंगल’ या चित्रपटातील ‘धाकड’ हे गाणं असो. रॅपर रफ्तारच्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं.

रफ्तारचं मूळ नाव ‘दिलीन नायर’ आहे.

पाकिस्तानी-अमेरिकन रॅपर बोहेमिया याने सुद्धा आपलं नाव बदललं आहे. त्याचं खरं नाव ‘रोजर डेव्हिड’ असं आहे.

‘गली बॉय’ या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंहने ज्या रॅपरची भूमिका साकारली आहे तो सुप्रसिद्ध रॅपर म्हणजे नेझी. रॅपर नेझीचं मूळ नाव ‘नावेद शेख’ असं आहे.

‘अभी तो पार्टी शुरु हुई है’, ‘पानी पानी’, ‘गेंदा फूल’ रॅपर बादशहाची सगळीच गाणी हिट असतात.

परंतु बादशाह हे त्याचं खरं नाव नसून ‘आदित्य सिंह सिसोदिया’ हे त्याचं मूळ नाव आहे.

डिव्हाइन या नावाने लोकप्रिय असणाऱ्या रॅपरचं खरं नाव ‘व्हिव्हियन फर्नांडिस’ असं आहे.

रॅपर यो यो हनी सिंहला कोण ओळखत नाही. ‘देसी कलाकार’, ‘ब्लू आईज’, ‘लव्ह डोस’ या गाण्यांमुळे हनी सिंह तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता.

हनी सिंहचं मूळ नाव ‘हृद्देश सिंह’ असं आहे.