
करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे लाडके कपल आहेत.

पण त्यांची पहिली भेट कशी झाली हे तुम्हाला माहितीये का? या भेटीच्या वेळी अक्षय कुमारने सैफ अली खानला बजावले देखील होते.

सैफ आणि करीना यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

या चित्रपटात त्या दोघांसोबत अभिनेता अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता.

करीनाने एका मुलाखतीमध्ये ‘माझ्यामुळे अक्षयने सैफला धमकी दिली होती’ असे सांगितले होते.

करीनाने ट्विंकल खन्नाचा चॅट शो ‘ट्वीक इंडिया’मध्ये हे सांगितले होते.

त्यावेळी तिने लव्ह स्टोरीदेखील सांगितली होती.

करीनाने सांगितले की अक्षयने, सैफला बाजूला घेतले होते आणि ही भयानक मुलगी आहे. ती एका खतरनाक कुटुंबातून आली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना विचार कर असे म्हटले होते.

ते ऐकून ट्विंकल खन्ना म्हणाली होती, ‘हा तर चांगला सल्ला दिला होता.’

पुढे करीना म्हणाली, सैफला अक्षयने धमकी दिली होती आणि माझ्यासोबत चुकीचे वागू नकोस असे देखील सांगितले होते.

त्यावर सैफने सकारात्मक प्रतिक्रिया देत मी तिला सांभाळेन असे म्हटले होते.