
लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अंकिताने काही महिन्यांपूर्वी प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.

सध्या अंकिता तिचा पती विकीसोबत ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे.

‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये या दोघांनीही पुन्हा लग्न केलं आहे.

या लग्नामध्ये अंकिता लोखंडे मराठमोळ्या पोशाखात दिसली.

या लूकमध्ये अंकिता प्रचंड सुंदर दिसत होती.

नॅशनल टेलिव्हिजनवर अंकिताच्या आईनं तिच्या अपुरी इच्छा व्यक्त केली होती.

अंकिता आणि विकीनं मुंबईत राजेशाही पद्धतीनं लग्न केलं.

मात्र त्यावेळी एक इच्छा अपुरी राहिली होती.

मराठमोळ्या पद्धतीनं लग्न व्हावं अशी अंकिताच्या आईची इच्छा होती.

विकी आणि अंकिता यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने ‘स्मार्ट जोडी’च्या मंचावर पुन्हा एकदा लग्न करत आईची इच्छा पूर्ण केली.

एवढंच नाही तर त्यांनी महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये खेळले जाणारे खेळही खेळले.

विकी जैनसोबत लग्न केल्यानंतर अंकिताचा हा पहिलाच रिअॅलिटी शो आहे.

या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)