
बॉलिवूडचे केवळ देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

रशियातही बॉलिवूडप्रेमींची कमी नाही. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याने रशियन लोकांना भुरळ पाडली. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

तर दिवंगत अभिनेता राज कपूर यांनी रशियन चाहत्यांच्या मनात घर केलं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

कलाकारांप्रमाणेच बॉलिवूडमधील काही चित्रपटही रशियात सुपरहिट ठरले.

दिवंगत अभिनेता राज कपूर यांचा ‘आवारा’ हा चित्रपट रशियात हिट ठरलेल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

१९५४ साली रशियात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. ‘आवारा’ चित्रपटाची तब्बल ६३.७ मिलियन तिकिटे रशियात विकली गेली होती, अशी माहिती आहे. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

‘बॉबी’ हा अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा चित्रपटदेखील रशियात हिट ठरला होता. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

या चित्रपटाची ६२.६ मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

‘आय अॅम अ डिस्को डान्सर’, ‘जिम्मी जिम्मी आजा’, ‘कोई यहाँ नाचे नाचे’ मिथुन चक्रवतींच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील सगळ्याच गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

रशियन चाहत्यांना देखील या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट देखील रशियात हिट होता. या सिनेमाची ६०.९ मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांच्या ‘बारूद’ या सिनेमानेदेखील रशियन चाहत्यांना वेड लावलं होतं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

या चित्रपटाची रशियात ६० मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘सीता और गीता’. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

रशियन चाहत्यांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळालं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

या चित्रपटाची अंदाजे ५५.२ मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

‘ममता’ हा चित्रपटदेखील रशियात हिट होता. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

या चित्रपटाची सुमारे ५२.१ मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

बॉलिवूडमधील ‘फूल और पत्थर’ या चित्रपटाला रशियन चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)

या चित्रपटाची ४५.४ मिलियन तिकिटे विकली गेली होती. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)