
बंगाली अभिनेत्री रुपा दत्ता हिला कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात पाकिट मारल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी अटक केली.

पोलिसांना तिच्या बॅगेतून ६५ हजार ७६० रुपये इतकी रक्कम सुद्धा सापडली.

मात्र चौकशीदरम्यान हे पैसे कुठून आले, याबाबत रुपा दत्ता समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही.

शिवाय तिने पहिल्यांदाच पाकिट मारले नसून यापूर्वी अनेकदा पाकिट मारल्याची धक्कादायक बाब देखील चौकशी दरम्यान समोर आली आहे.

रूपा दत्ताने १० वर्षांची असल्यापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे.

तिने अनेक बंगाली मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

अभिनेत्रीसोबतच ती स्वतःला लेखिका, दिग्दर्शिका, तत्वज्ञानी, सामाजिक कार्यकर्ती म्हणवते.

‘जय माँ वैष्णो देवी’ या मालिकेत रुपाने ‘वैष्णो देवी’ हे पात्र साकारलं होतं.

‘सोल फाऊंडेशन’ची ती संस्थापक असून ‘रुपा दत्ता ऍक्टिंग अकॅडमी’ देखील ती चालवते.

काही वर्षांपूर्वी रूपाने हिंदी चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवरही लैंगिक छळाचा आणि ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता.

परंतु चौकशी दरम्यान हे आरोप खोटे असून यात काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं होतं.

(सर्व फोटो : रुपा दत्ता/ फेसबुक)