
‘देवयानी’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणून संग्राम साळवीला ओळखले जाते.

संग्राम आणि खुशबू काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले आहेत. त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव ‘राघव’ असं ठेवलं आहे.

संग्राम हा नेहमी त्याच्या मुलाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

नुकतंच संग्रामने त्याच्या मुलाचा आणि पत्नी खुशबू तावडेचा एक फोटो शेअर केला आहे.

यात ते एका शिवमंदिरात दर्शन करण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. या फोटोत संग्राम, खुशबू, राघव असे तिघेही दिसत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच खुशबूने बाळाचा चेहरा दिसणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

बाळाचा फोटो पाहून अनेकांनी ‘क्यूट’, ‘छान’, ‘मस्तच’ अशा कमेंटही पाहायला दिसत आहे.

संग्राम साळवीने ‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेसोबतच ‘मी तुझीच रे’ तसचं ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांसह अनेक मालिकांमध्ये झळकला आहे.

तर खुशबू तावडे देखील ‘एक मोहोर अबोल’, तू भेटशी नव्याने, पारिजात या मालिकांमध्ये झळकली आहे.

तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा, प्यार की ये एक कहानी अशा हिंदी मालिकांमध्ये देखील खुशबूने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

‘सांजबहर’ या शॉर्ट फिल्ममध्ये संग्राम आणि खशबू एकत्र झळकले होते. यावेळीच दोघांमध्ये सूत जुळलं होतं. त्यानंतर मार्च २०१८ सालामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. (सर्व फोटो – खुशबू तावडे/ इन्स्टाग्राम)