
The Kashmir Files हा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जवळपास १५० कोटींचा व्यवसाय केला आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या अगोदरही अनेक चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत आणि ते देखील चांगलेच चर्चे आले होते. काहींवर तर बंदी देखील घालण्यात आली होती.

२००५ मध्ये ‘परजानिया’नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट २००२ च्या गुजरात दंगलीवर आधारित होता. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती.

जेसिका लाल हत्या प्रकरणावर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपटही चांगला गाजला होता. राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांनी या चित्रपटात भूमिका साकरली होती.

२०१९ मध्ये आलेला ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपटही सत्य घटनेवर आधारित होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.

जॉन अब्राहम प्रमूख भूमिकेत असलेला ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट २००८ च्या बाटला हाऊस एन्काउंटरवर आधारित होता. हा चित्रपट खूप वादात सापडला होता. मात्र चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सरासरी होते.

जॉन अब्राहमचा आणखी एक चित्रपट, ज्याचे नाव ‘परमाणू’ आहे, हा देखील एका सत्य घटनेवर आधारित होता. हा चित्रपट १९९८ मध्ये भारताने पोखरणमध्ये केलेल्या अणु चाचणीवर आधारित होता. कमाईच्या बाबतीत चित्रपट सरासरीच होता.

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेवर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापासून थांबवण्यात आला होता. चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित ‘नीरजा’ हा चित्रपट लोकांना आवडला. या चित्रपटासाठी अभिनेत्री सोनम कपूरलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट हिट ठरला होता.