
अभिनेत्री सोनम कपूरने सोमवारी आपण गरोदर असल्याची घोषणा केली. तिच्यासोबतच कॉमेडियन भारती सिंग आणि अभिनेत्री काजल अग्रवाल याही लवकरच आई होणार आहेत. या निमित्ताने जाणून घ्या सिनेसृष्टीतल्या मातृत्वाची चाहूल लागलेल्या अभिनेत्रींबद्दल…

अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा हे लवकरच आई बाबा होणार आहेत. सोमवारी त्यांनी याबद्दलची घोषणा केली.

सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले फोटो शेअर केले होते. हे दोघेही २०१८ साली विवाहबंधनात अडकले होते.

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरीही लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

भारती सिंगने नुकतंच मॅटर्निटी फोटोशूट केलं. त्यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावरून शेअर केले होते.

वरुण धवनचा भाऊ रोहित धवन लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी जान्हवी धवन आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. वरुणची पत्नी नताशा दलाल हिने जान्हवीच्या डोहाळेजेवणाचे फोटो शेअर केले होते.

निक जोनासचा भाऊ जॉय जोनस आणि त्याची पत्नी म्हणजे प्रियंका चोप्राची आई हे लवकरच दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. २०२० मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला होता.

अभिनेत्री काजल अग्रवालही लवकरच आई होणार आहे.

तिने फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेंसीबद्दलची घोषणा केली होती. त्यावेळी तिने आपला पती गौतम किचलूसोबतचा फोटोही शेअर केला होता.

पॉप सिंगर रिहानाही लवकरच आई होणार आहे. तिने बेबी बम्पसह आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.