
यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

पुरस्कार कोणत्या सदस्यांना मिळणार याचं कुतूहल आहेच. त्याचसोबत कलाकारांचे जबरदस्त परफॉर्मन्स सोहळ्याची शान वाढवणार आहेत.

यंदाच्या सोहळ्याची खासियत म्हणजे सासू-सुनांचे धमाकेदार परफॉर्मन्स.

मालिकांमध्ये सासू-सुनांना आपण वेगळ्या रुपात पहात असतो. मात्र स्टार प्रवाह परिवार सोहळ्यात याच सासू- सुनांचं अनोखं रुप पाहायला मिळणार आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी-माई, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा- सौंदर्या, ‘अबोली’ मालिकेतील अबोली-रमा आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती- अनघाचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना या सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल.

स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.