
काही टीव्ही अभिनेत्रींची ब्रेकअपमुळे वाईट अवस्था झाली होती. यापैकी काही अभिनेत्रींनी तर त्यातून ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तंत्र-मंत्र आणि मांत्रिकाची मदत घेतली होती. परंतु कालांतराने त्या या दुःखातून सावरल्या आणि आता त्यांच्या करिअरमध्ये उत्तम काम करत आहेत. यापैकी अनेक अभिनेत्रींनी चांगले पार्टनर शोधून लग्न देखील केलंय.

सुष्मिता सेनची वहिनी होण्यापूर्वी चारू असोपाचा ब्रेकअप झाला होता. चारू असोपा तिचा कोस्टार नीरज मालवीयसोबत लग्न करणार होती, पण लग्नाच्या काही दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले. चारूने या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी खूप प्रवास केला. एवढेच नाही तर नैराश्य टाळण्यासाठी चारू असोपाने झोपेच्या गोळ्या घेणे सुरू केले होते, असंही तिने सांगितलं होतं.

दिव्यांका त्रिपाठी टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रासोबत ८ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती, पण अचानक शरदने मूव्ह ऑन केल्यानंतर दिव्यांका इतकी तुटली की ती त्याला परत मिळवण्यासाठी तांत्रिकाकडे गेली.

राजीव खंडेलवालच्या शोमध्ये दिव्यांकाने सांगितले होते की, जेव्हा ती या नैराश्यातून कशीतरी बाहेर आली तेव्हा तिला समजले की ती किती मूर्खपण करत होती.

टीव्हीची नागिन अदा खान हिलाही ब्रेकअपचे दुःख सहन करावे लागले आहे. अभिनेता अंकित गेरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अदा खानने सांगितले होते की, ब्रेकअपनंतर तिचा प्रेमावरील विश्वास उडाला होता, पण कालांतराने ती यातून बाहेर पडली आणि पूर्वीपेक्षा जास्त स्ट्रॉँग झाली.

अनुषा दांडेकरने बिग बॉस १५ स्टार करण कुंद्राला डेट केले आहे. गेल्या वर्षी अनुषा दांडेकरचे करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाले होते. अनुषा दांडेकरने ब्रेकअपनंतर करण कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. अनुषा सध्या जेसन शाहसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय.

२०१५ मध्ये काम्या पंजाबीचे करण पटेलसोबत ब्रेकअप झाले होते. करण पटेलने काम्या पंजाबीची फसवणूक करत अंकिता भार्गवशी लग्न केले होते. करण पटेल सोबत ब्रेकअपनंतर काम्या पंजाबी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला यातून बाहेर पडायला तब्बल अडीच वर्ष लागली.

टीव्ही अभिनेत्री सना खान माल्विन लुईससोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा सनाने माल्विनवर फसवणूक केल्याचा आरोप करत ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले. मात्र, आता सना तिचे दुःख विसरून लग्नानंतर नव्या आयुष्याचा आनंद घेत आहे.

अविनाश सचदेवसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रुबिना दिलेकही डिप्रेशनमध्ये गेली होती. सुमारे दीड वर्ष ती एकांतवासात होती. रुबीनाने स्वतःला तिच्या कुटुंबापासूनही दूर केले होते. दरम्यान, अभिनव शुक्ला तिच्या आयुष्यात आल्यानंतर दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. (सर्व फोटोः सोशल मीडियावरून साभार)