
कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले आहेत.

‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका शॅस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. (AP Photo/Jae C. Hong)

‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

जेन कॅम्पियन यांना ‘द पॉवर ऑफ द डॉग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

जेम्स बाँडच्या ‘नो टाइम टू डाय’ या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या ‘आर्मी ऑफ द डेड’ ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत ‘द समर ऑफ सोल’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले.

बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे.

बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे.

‘द लाँग गुडबाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

केनेथ ब्रानाघ निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.

‘ड्राइव्ह माय कार’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. (सर्व फोटो : Reuters)