
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले आहे.

अंकिता आणि विकीची जोडी ही ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी विकीने खुलासा केला होता की तो घरजावई म्हणून राहतो.

तर आता अंकिता आणि विकीने त्यांच्या मुंबईतल्या नव्या घराची एक झलक शेअर केली आहे.

लग्नानंतर आता ते दोघे त्यांच्या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत.

तर अंकिताने शेअर केलेल्या या तिच्या नव्या घराच्या फोटोमध्ये ती पती विकी जैनसोबत बाल्कनीत उभे दिसत आहे.

अंकिता आणि विकीने काही दिवसांपूर्वी मर्सिडी कार खरेदी केली आणि त्या कारची किंमत ही ७१ लाखाच्या आसपास आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आले.

अंकिता आणि विकीने १४ डिसेंबर रोजी लग्न केले. (All Photo Credit : Ankita Lokhande Instagram)