
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

२५ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातंच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया.

बाहुबली २ : राजमौलींचा ‘बाहुबली २’ हा चित्रपट खूप गाजला. ‘आरआरआर’ प्रमाणेच या चित्रपटाने देखील प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडले होते.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘बाहुबली २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २१७ करोड रुपयांचा गल्ला जमवला होता.

धूम ३ : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धूम ३’. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता आमिर खान, अभिषेक बच्चन, यश चोप्रा आणि अभिनेत्री कतरिना कैफ अशी स्टार कास्ट होती.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

संजू : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. ‘धूम ३’ प्रमाणेच या चित्रपटाने देखील तीन दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला होता.

टायगर जिंदा है : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने देखील चार दिवसांत २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

२०१७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दंगल : २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ या चित्रपटाने चार दिवसांत २०० कोटींचा गल्ला जमवला होता.

या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुख्य भूमिकेत होता.

पुष्पा : २०२१च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या या दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे.

मग ती पुष्पाची हुक स्टेप असो अथवा चित्रपटातील डायलॉग. या चित्रपटातील पुष्पाने सगळ्यानांच वेडं करून सोडलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.

अवघ्या पाच दिवसांत ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. (सर्व फोटो : आयएमडीबी)