
अभिनेता कैलास वाघमारे हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो.

कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.

कैलास वाघमारेची पत्नी मीनाक्षी राठोड ही गरोदर असून लवकरच आई होणार आहे.

मिनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली.

मिनाक्षीने ही गुडन्यूज देताना काही फोटो शेअर केले आहेत. यात ती आणि कैलास दोघेही दिसत आहेत.

यावेळी तिने निळ्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर कैलासने तिला मॅचिंग असा निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

त्यासोबतच तिने छान फुलांची ज्वेलरीही परिधान केली आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

यातील दोन फोटोत मिनाक्षी ही झोपाळ्यावर बसल्याचे दिसत असून ती फार गोड लाजताना दिसत आहे. मिनाक्षीचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

या फोटोला कॅप्शन देताना ‘हो! आम्ही गरोदर आहोत’, असे मिनाक्षीने म्हटले आहे. तिच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मिनाक्षी ही सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीच्या भूमिकेत दिसत आहे.