
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला २ एप्रिल रोजी अपघात झाला.

मलायकाच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला.

या घटनेतून मलायका थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

याआधी असे कार अपघात बॉलिवूड सेलेब्रिटींच्या जीवावर बेतू शकले असते. पण नशीब बलवत्तर म्हणून यातून ते थोडक्यात बचावले.

शबाना आझमी : प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीलाही अपघात झाला होता.

२०२०मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या होत्या.

महिमा चौधरी : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या कारचा अपघातही तिच्या जीवावर बेतू शकला असता.

‘दिल क्या करे’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून घरी परतत असताना तिच्या गाडीला अपघात झाला होता.

उलट दिशेने येणाऱ्या एका ट्रकने महिमा यांच्या गाडीला धडक दिली होती. एका मुलाखती दरम्यान या घटनेचा संपूर्ण थरार तिने सांगितला होता.

हेमा मालिनी : प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गाडीला २०१५ मध्ये अपघात झाला होता.

एका कारने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. या अपघातात धडक देणाऱ्या कारमधील दोन वर्षीय चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागले होते.

याबद्दल हेमा मालिनी यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. “चिमुकलीच्या वडिलांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले असते तर आज दोन वर्षीय मुलीचे प्राण वाचले असते.”, असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं.

वरुण धवन आणि आलिया भट्ट : ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना अहमदाबाद येथे आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या कारला अपघात झाला होता.

सिग्नलला गाडी उभी असताना दुसऱ्या गाडीने आलिया आणि वरून यांच्या कारला धडक दिली होती.

या अपघातात आलिया आणि वरुणला कोणतीही दुखापत झाली नव्हती. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)