
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘केजीएफ २’ हा दाक्षिणात्य चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘केजीएफ’ हा चित्रपट खूप गाजला.

‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘केजीएफ २’ चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे.

अॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटात यश ‘रॉकी भाई’च्या भूमिकेत आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

या चित्रपटात संजय दत्त ‘अधिरा’ हा खलनायकाची भूमिका तर रवीना टंडन रामिका सेन साकारताना दिसणार आहे.

हा चित्रपट कन्नड, तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

खरं तर ‘केजीएफ’ हा चित्रपट फक्त कन्नडमध्ये बनवण्यात येणार होता.

पण यशने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हा चित्रपट इतर भाषेत प्रदर्शित करण्याचा सल्ला दिला.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

म्हणूनच ‘केजीएफ २’ चित्रपटासाठी यशची भूमिका अभिनयापलीकडे देखील महत्त्वाची मानली जात आहे.

या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ साकारण्यासाठी यशने तब्बल २५-३० कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती आहे.

एवढंच नाही तर ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या कमाईतील काही टक्के रक्कम देखील यशला मिळणार आहे.

चित्रपटांसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी यश एक आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)