
लोकप्रिय अभिनेत्री आसावरी जोशी यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.(फोटो : आसावरी जोशी/ इन्स्टाग्राम)

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आसावरी यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. (फोटो : आसावरी जोशी/ इन्स्टाग्राम)

आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे.(फोटो : आसावरी जोशी/ इन्स्टाग्राम)

सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. (फोटो : आसावरी जोशी/ इन्स्टाग्राम)

आसावरी जोशी यांच्या राजकीय प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. (फोटो : आसावरी जोशी/ इन्स्टाग्राम)

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या आसावरी या काही पहिल्या अभिनेत्री नाहीत. (फोटो : NCP/Twitter)

याआधीही अनेक मराठी कलाकारांनी अभिनय क्षेत्रात सक्रिय असताना देखील हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधत राजकारणात प्रवेश केला आहे. (फोटो : NCP/Twitter)

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

परंतु २०१९ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रवादीचे शिरूर येथील खासदार आहेत.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अभिनेत्री शिल्पा शिंदे घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस ११’ या शोची ती विजेती होती. (फोटो : शिल्पा शिंदे/ इन्स्टाग्राम)

शिल्पाने देखील २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (फोटो : शिल्पा शिंदे/ इन्स्टाग्राम)

२०२० मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर आणि अभिनेता विजय पाटकर यांनी हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधत राजकारणात प्रवेश केला. (फोटो : NCP/Twitter)

अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव. (फोटो : प्रियदर्शन जाधव/ इन्स्टाग्राम)

त्याने देखील २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो : प्रियदर्शन जाधव/ इन्स्टाग्राम)

अभिनेता गिरीश परदेशी यांनी देखील २०२० मध्ये हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधत राजकारणात प्रवेश केला. (फोटो : गिरीश परदेशी/ इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्री माया जाधव यांनी देखील २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो : NCP/Twitter)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.