
‘बिग बॉस’ फेम हिना खान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील हिनाची भूमिका प्रचंड गाजली होती.

या मालिकेमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी हिना खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळी आहे.

अभिनयासोबतच हिना तिच्या फटकळपणामुळे अनेक वेळा चर्चेत असते.

सध्या हिना दुबई फिरायला गेली आहे.

हिनाला भटकंतीची प्रंचड आवड आहे.

आईसोबत हिना दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

दुबई म्हणजे गगनचुंबी इमारती, स्वच्छता आणि नियमांचं काटेकोरपणं केलं जाणारं शहर.

हिनाने दुबई ट्रिपचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दुबईचं वैशिष्ट्यं म्हणजे प्रशस्त मॉल्स आणि उंचच उंच इमारती.

दुबईचे भव्य मिरॅकल गार्डन…

जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणारी बुर्ज खलिफा ही इमारत सध्या दुबईच्या पर्यटनाचं केंद्र बनली आहे.

दुबईच्या वाळवंटात हिना…

हिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

(सर्व फोटो सौजन्य : हिना खान / इन्स्टाग्राम)