
बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात रणबीर कपूर सध्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. मागच्या काही वर्षांपासून तो आलिया भट्टला डेट करत आहे.

आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आलियाला डेट करण्याआधी रणबीरचं नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

एकेकाळी रणबीरचं नाव अभिनेत्री सोनम कपूरशी जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘सांवरिया’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.

या चित्रपटाच्या सेटवरच दोघांमधील जवळीक वाढली. रणबीर आणि सोनमनं एकमेकांना डेट काही काळ डेट केलं मात्र लवकरच दोघंही वेगळे झाले.

रणबीर कपूरचं सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नातं होतं दीपिका पदुकोणसोबतचं. एकेकाळी हे दोघंही बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जात होते.

काही रिपोर्ट्सनुसार रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एंट्री झाल्यानं दीपिका आणि त्याच्या नात्यात दुरावा आला आणि दोघंही वेगळे झाले.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकमेकांना ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

या चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमातही पडले. दोघं एकमेकांशी लग्न करणार अशा चर्चा सुरू असतानाच अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

रणबीर कपूरचं नाव एकेकाळी अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबतही जोडलं गेलं होतं. या दोघांनी ‘रॉकस्टार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

या चित्रपटाच्या सेटवरूनच रणबीर आणि नर्गिसनं एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर नर्गिससाठी रणबीरनं कतरिनाशी ब्रेकअप केल्याचंही बोललं जातं.

रणबीर कपूरनं प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला देखील डेट केलं आहे. या दोघांनी ‘अंजाना अंजानी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

रणबीर आणि प्रियांकाचं नातं फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची एकेकाळी बरीच चर्चा झाली होती. दोघांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं.

दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा झाली होती मात्र रणबीर किंवा श्रुतीनं या नात्यावर कधीच कोणतंही भाष्य केलं नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी रणबीर कपूरचं अवंतिका मालिकसोबत अफेअर होतं. मात्र नंतर काही कारणानं दोघांचंही ब्रेकअप झालं. (फोटो साभार- सोशल मीडिया)