
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली जोडी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.

विवाह सोहळ्यादरम्यान कपूर कुटुंबीय हटके लूकमध्ये दिसले.

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्याला सैफ अली खान आणि करीना कपूरने हजेरी लावली. या सोहळ्यासाठी करीनाने मनीष मल्होत्राने डिजाईन केलेली साडी परिधान केली होती. तर सैफ अली खानने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

रिद्धिमा कपूरने लग्नसोहळ्यासाठी खास मिरर लेहेंगा परिधान केला होता.

प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांनी लाडक्या लेकाच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. सप्तरंगी लेहेंगा आणि खड्यांची ज्वेलरी अशा पेहरावात त्या दिसल्या.

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमासाठी नीतू आणि रिद्धिमा कपूर यांनी सलवार कुर्ता असा खास लूक केला होता.

आलिया-रणबीरच्या मेहेंदी सोहळ्याला करीना कपूर पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसून आली.

तर करिष्मा कपूरने केशरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता.

(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)