
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या अभिनय कौशल्यामुळे सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तो त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो.

रणवीर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना पाहायला मिळतो.

नुकतंच रणवीरने सोशल मीडियावर शर्टलेस फोटो शेअर केले आहेत.

रणवीरने शेअर केलेल्या या फोटोत त्याची जबरदस्त बॉडी, फिटनेस पाहायला मिळत आहे.

रणवीरचे हे फोटो पाहून तो त्याच्या फिटनेसची जबरदस्त काळजी घेत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे या फोटोत त्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

रणवीरने हे फोटो शेअर करतेवेळी ‘टीझर’ असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.

रणवीरच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरनेही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. सईने रणवीरच्या या शर्टलेस फोटो ‘हान…!’अशी कमेंट केली आहे.

मात्र तिच्या या कमेंटवर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. त्यातील एका नेटकऱ्याने सईला ‘काय हाणायचं आहे?’ असा प्रश्न विचारला आहे.