
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे बहुचर्चित लग्न १४ एप्रिल २०२२ झालं. या जोडप्याने जवळपास ४ वर्षे डेट केलं आणि २०१८ मध्ये मुंबईत झालेल्या अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये पहिल्यांदा एकत्र येऊन एकमेकांवरील प्रेम जाहीर केलं. अखेर नवरदेवाची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांनी लग्नाची तारीख ठरवली. अगदी खाजगी समारंभात, कुटुंब आणि मित्रांमध्ये, या जोडप्याने मुहूर्तानुसार ठीक ३.३० वाजता सप्तपदी घेतले. अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी डेस्टिनेश वेडिंगला नापसंती देत थेट मुंबईत लग्न उरलंय. पाहा सविस्तर…

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा यांचा ८ मे २०१८ रोजी लग्नासाठी उधळपट्टी न करता मुंबईतच घरी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. या जोडप्याचा शीख पद्धतीने विवाह झाला आणि आनंद कारज सोहळा मुंबईतील रॉकडेल येथील तिची मावशी कविता सिंग यांच्या निवासस्थानी झाला. कपूर आणि आहुजांनी संध्याकाळी द लीला, मुंबई येथे एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली आणि यावेळी अनेक बी-टाऊनर्स उपस्थित होते.

करीना कपूर खान आणि छोटा नवाब सैफ अली खान यांच्यात एक स्वप्नवत लव्हस्टोरी आणि एक फेअरीटेल वेडिंग झालं. १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्नाच्या आधी या दोघांनी अनेक वर्षे डेट केले. करीनाच्या लग्नासाठी ऐस डिझायनर रितू कुमार यांनी तिचे ट्रेडिशनल आऊटफिट्स डिझाईन केले होते.

. २४ फेब्रुवारी १९९९ रोजी या जोडप्याने लग्न केलं. मीडिया आणि चाहत्यांचा उन्माद टाळण्यासाठी या जोडप्याने लग्नाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आणि ते अजयचे स्वतःचे घर होतं.

साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईच्या आलिशान ताज हॉटेलमध्ये व्यापारी गौतम किचलूशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाला कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे लग्न हे खाजगी पद्धतीने केले होते ज्यात फक्त कुटुंबे आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केलं. ((All Photo: Express Archives))