
लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आली.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत ‘संजना’ हे पात्र साकारून रुपाली घराघरात पोहचली.

‘संजना’ या भूमिकेमुळे रुपालीला खरी ओळख मिळाली.

रुपालीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये रुपालीने जांभळ्या रंगाची खणाची नऊवारी साडी परिधान केली आहे.

साजेसा मेकअप आणि ज्वेलरीने मराठमोळा साज केला आहे.

केसांत गुलाबाची फुलं माळल्यामुळे रुपालीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

रुपालीचा नथीचा नखरा.

फोटोशूटसाठी रुपालीने विविध पोझ दिल्या आहेत.

पारंपारिक पेहरावातील रुपालीचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

रुपालीचं मादक सौंदर्य.

रुपालीच्या या मोहक अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.

(सर्व फोटो : रुपाली भोसले/ इन्स्टाग्राम)