
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ बहुचर्चित रिअॅलिटी शो आहे.

सर्वांत वादग्रस्त व तितकाच चर्चेत राहिलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ने अनेकांना प्रसिद्धी मिळवून दिली.

अभिनेत्री स्मिता गोंदकरने ‘बिग बॉस’च्या सर्व स्पर्धकांसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्मिताने पार्टीसाठी खास सजावट केली होती.

मेघा धाडे, शिव ठाकरे, विशाल निकमसह ‘बिग बॉस’मधील सर्व कलाकार या पार्टीला उपस्थित होते.

अनेक कलाकारांनी पार्टीत जबरदस्त डान्स केला.

या पार्टीला अभिनेता सिद्धार्थ जाधवने ही हजेरी लावली होती.

‘बिग बॉस’ मराठीचं कलाकार मस्तीत दंग होऊन पार्टीत डान्स करत आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात एकमेकांशी भांडताना दिसलेल्या या स्पर्धकांची पार्टीमध्ये एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली.

‘बिग बॉस’ मराठीच्या या घवघवीत यशाचा आनंद साजरा करण्यात आला.

(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)