
सध्या दाक्षिणात्य अभिनेत्यांचा बोलबाला आहे. जिकडेतिकडे साऊथ हिरोंचीच चर्चा आहे.

‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘आरआरआर’, ‘पुष्पा’ असे एक सो एक हिट चित्रपटांनी दाक्षिणात्य अभिनेत्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

दाक्षिणात्य अभिनेत्यांनी अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

‘केजीएफ’मधील रॉकीभाई असो अथवा ‘पुष्पा’ चित्रपटातील पुष्पराज…यांची क्रेझ काही केल्या कमी होत नाही.

दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच अभिनेत्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत चालली आहे.

या अभिनेत्यांनी त्यांच्या अनोख्या स्टाइलने चाहत्यांना वेडं करून सोडलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे हे कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे तुम्हाला माहितीये का?

अभिनय आणि स्टाइलने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या दाक्षिणात्य कलाकारांनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडमधील सुपरस्टार्सलाही मागे टाकलं आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांना कोण ओळखत नाही.

त्यांनी कायमच अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

रजनीकांत हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडे अभिनेता आहेत.

एका चित्रपटासाठी ते तब्बल १०० कोटी रुपये मानधन घेतात.

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

ज्युनिअर एनटीआरने ‘आरआरआर’ चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

मीडिया रिपोर्टनुसार, ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी ४५ करोड रुपये मानधन घेतो.

‘बाहुबली’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास.

प्रभासने अभिनयाच्या जोरावर केवळ दाक्षिणात्य नाही तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.


‘आरआरआर’ चित्रपटातील अभिनेता राम चरणची छबी अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

राम चरण देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

राम चरण देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापति विजयने ‘बीस्ट’ चित्रपटातून धमाका केला आहे.

थलापति विजय हा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, थलापति विजय एका चित्रपटासाठी २० करोड रुपये मानधन घेतो.

‘केजीएफ’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे रॉकिंग स्टार यश.

यशचा ‘केजीएफ २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

रॉकिंग स्टार यश एका चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)