-
दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.
-
‘केजीएफ’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा सिक्वेल असणारा हा चित्रपट १४ एप्रिलला प्रदर्शित झाला.
-
पहिल्याच आठवड्यात ‘केजीएफ २’ या चित्रपटाने २६८.६३ कोटींची कमाई केली आहे.
-
‘केजीएफ २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती.
-
‘केजीएफ २’ रॉकिंग स्टार यश या चित्रपटात रॉकी भाईची भूमिका साकारत आहे.
-
या चित्रपटातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरत आहे.
-
‘केजीएफ २’ चित्रपटातील रॉकी भाईच्या गर्लफ्रेण्डची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने या चित्रपटात रॉकी भाईची गर्लफ्रेण्ड रिनाची भूमिका साकारली आहे.
-
रॉकी भाईवर जिवापाड प्रेम करणारी रिना एका गॅंगस्टरची मुलगी आहे.
-
‘केजीएफ’ हा श्रीनिधी शेट्टीचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाने श्रीनिधीला सिनेसृष्टीत एक ओळख मिळवून दिली.
-
श्रीनिधीने मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
‘मिस दिवा २०१६’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
-
त्यानंतर श्रीनिधीने ‘मिस सुपरनॅशनल २०१६’ हा किताब देखील पटकावला.
-
हा किताब नावावर करणारी श्रीनिधी दुसरी भारतीय मॉडेल आहे.
-
याव्यतिरिक्त श्रीनिधीने ‘मिस साउथ इंडिया’, ‘मिस कर्नाटक’, ‘मिस ब्यूटीफुल स्माइल’ असे अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत.
-
श्रीनिधीने ‘मिस इंडिया २०१७’ या स्पर्धेतही भाग घेतला होता.
-
परंतु त्याच वेळी तिला ‘केजीएफ’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
-
त्यामुळे मॉडलिंग अर्धवट सोडून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.
-
पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर श्रीनिधी शेट्टी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
-
‘केजीएफ’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या श्रीनिधीचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.
-
श्रीनिधी शेट्टीचे इन्स्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
सोशल मीडियावरून श्रीनिधी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
‘केजीएफ २’ नंतर आता श्रीनिधी ‘कोबरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो : श्रीनिधी शेट्टी/ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…