
सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘बाहुबली-2’ च्या नावावर आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई १ हजार ०३१ कोटी रुपये आहे.

‘KGF 2’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ७८० कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.

या यादीत पुढे एसएस राजामौली यांची ‘आरआरआर’ आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ७५२ कोटी रुपये आहे.

राजामौलीच्या ‘बाहुबली’चे एकूण कलेक्शन ४१८ कोटी रुपये होते.

रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ ने एकूण ४०८ कोटींची कमाई केली होती.

आमिर खानच्या ‘दंगल’च्या कमाईचा एकूण आकडा ३८७ कोटींवर पोहोचला होता.

रणबीर कपूरच्या ‘संजू’ने ३४१ कोटींचा व्यवसाय केला होता.

राजकुमार हिरानीच्या ‘पीके’ ने ३३९ कोटींची कमाई केली होती.

‘बजरंगी भाईजान’ची कमाईही जवळपास ३३९ कोटी रुपये होती.

या यादीत सलमान खानचा ‘सुलतान’ ३२० कोटींच्या कमाईसह दहाव्या क्रमांकावर आहे.