-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं डेस्टिनेशन वेडिंग तर कमालीचं होतं. या दोघांनी लग्नासाठी फिका पिवळा रंग आणि लाल रंगाची वरमाळा घातली होती.
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या लग्नासाठी पारंपरिक पद्धतीच्या पेहरावाची निवड केली होती. त्याचबरोबरीने लुकला साजेशी अशी लाल रंगाच्या फुलांची वरमाळा दीपिका-रणवीरने एकमेकांना घालती होती.
-
. दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. या खास दिवशी दिया तर अगदी खुलून दिसत होती. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांचा वापर करून दिया-वैभवची वरमाळा तयार करण्यात आली होती.
-
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी त्यांच्या लग्नासाठी डिझायनर ड्रेस परिधान केले होते. तसेच या दोघांनी एकमेकांना घातलेली लाल रंगाची वरमाळा सगळ्यांच लक्ष वेधून घेणारी होती.
-
मौनी रॉय आणि सुरज नांबियारच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. या दोघांच्या वेडिंग लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंच. पण त्याचबरोबरीने या दोघांनी लाल रंगाच्या फुलांची घातलेली वरमाळा अधिक सुंदर दिसत होती.
-
राजकुमार राव आणि पत्रलेखानेही अगदी थाटामाटात लग्न केलं होतं. यावेळी या दोघांनी एकमेकांला झेंडुच्या फुलांची वरमाळा घातली होती. (सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
वरूण धवनने गेल्या वर्षी गर्लफ्रेंड नताशा दलालबरोबर लग्नगाठ बांधली. पांढरा आणि सोनेरी रंग अशी त्यांच्या लग्नाची थीम होती. या थीमलाच साजेशी अशी फिक्या पिवळ्या रंगाची वरमाळा घालणं या कपलने पसंत केलं होतं.
-
कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न टॉक ऑफ द टाऊन होतं. कतरिना-विकीच्या वेडिंग लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचबरोबरीने त्यांनी एकमेकांना घातलेली मोगऱ्याच्या फुलांची वरमाळा अधिक आकर्षक वाटत होती.
-
. यामी गौतम आणि आदित्य धर यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न करणं पसंत केलं. यावेळी यामीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. तसेच या सेलिब्रिटी कपलने परिधान केलेली लाल रंगाची वरमाळा आकर्षक वाटत होती. वरमाळा तयार करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा देखील वापर करण्यात आला होता. (सौजन्य – सगळे फाईल फोटो)

पुणे : रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणी यांनी अर्ध्यात सोडला कार्यक्रम