
‘माझा होशील ना’ मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेता विराजस कुलकर्णी घराघरात पोहोचला.

विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

विराजस हा उत्तम लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातदेखील काम केले आहे.

विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत येत्या ७ मे रोजी पुण्यामध्ये विवाहबद्ध होणार आहे.

जानेवारी महिन्यात शिवानी आणि विराजसचा साखरपुडा पार पडला होता.

सध्या या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

नुकतंच मेहंदी सोहळा पार पडला. याचे फोटो शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

मेहंदी सोहळ्यासाठी शिवानीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

फुलांच्या ज्वेलरीमध्ये शिवानीचं सौंदर्य खुलून दिसत होतं.

शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे.

शिवानी आणि विराजस नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

(सर्व फोटो : शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)