
सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. मग तो बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून झालेला वाद असो किंवा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कलाकारांनी केलेली वक्तव्य असो.

आता पुन्हा एकदा करण जोहर चर्चेत आहे ते त्याच्या याच ‘कॉफी विथ करण’ शोमुळे.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो आता टीव्हीवर प्रसारित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे.

नुकतंच करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

‘कॉफी विथ करण’चा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची वेगळी मांडणी, कलाकारांना एकत्र बसवून त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे यामुळे हा शो चांगलाच चर्चेत होता.

‘कॉफी विथ करण’चे तब्बल सहा सीझन प्रदर्शित झाले आहेत. लवकरच शोचा सातवा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘स्टुडंड ऑफ द इयर’, ‘ए दिल है मुश्किल’ असे एक सो एक चित्रपट बॉलीवूडला दिले.

चित्रपटातून नवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी करण जोहर देत असतो.

बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट बनवणारा करण जोहर लक्झरियस आयुष्य जगतो.

करण जोहरचा मुंबईत आलिशान बंगला आहे.

या बंगल्याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये इतकी आहे.

याशिवाय मलबार हिल येथे २० करोड किंमतीचा त्याचा फ्लॅट देखील आहे.

करण जोहरकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे.

एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी करण जोहर सुमारे तीन करोड रुपये घेतो.

करण जोहर वर्षाला सुमारे शंभर करोड रुपये कमावतो.

मीडिया रिपोर्टनुसार, करण जोहरकडे एकूण २०० मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, करण जोहर/ इन्स्टाग्राम)