
स्टारकिड अभिनेता वरुण धवनने स्वतः मेहनत करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

आता तो एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांमध्ये फि घेतो.

वरुणकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

एसयुवी, ऑडी क्यू ७ सारख्या महागड्या गाड्या वरुणकडे आहेत.

तसेच ८८ लाख रुपयांची मर्सिडीज बेंज, ५९ लाख रुपायांची LR3 गाडी देखील वरुणकडे आहे.

त्याशिवाय रॉयल एनफिल्ड ही बाईकसुद्धा वरुण वापरतो.

कमी वयात अधिक फि घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये वरुणचंही नाव आहे. आज तो कोट्यावधी रुपायांचा मालक असल्याचंही बोललं जातं.

‘कुली नंबर १’ चित्रपटासाठी वरुणने २५ कोटी रुपये फि घेतली होती.

वरुणने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)