
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले.

या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता सोशल मीडियावर शिवानीच्या मंगळसूत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवानीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

या नव्या फोटोमध्ये शिवानी पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळतेय.

जांभळ्या रंगाची साडी, दागदागिने, नथ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र.

नेटकऱ्यांना शिवानीचे हे मंगळसूत्र प्रंचड आवडले आहे.

लग्नात शिवानीने दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती. तर विराजसनेही तिला मॅचिंग असा कुर्ता परिधान केला होता.

जानेवारी महिन्यात विराजस-शिवानीचा साखरपुडा पार पडला होता.

शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.

‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केले होते.

या फोटोंवर चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

विराजस आणि शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे / इन्स्टाग्राम)