-
९ मे १९८९मध्ये हैद्राबाद येथे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा जन्म झाला.
-
२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे विजयची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.
-
विजयचे वडील देवरकोंडा गोवर्धन राव हे देखील दिग्दर्शक होते.
-
छोट्या पडद्यावरी शोचे दिग्दर्शन करणाऱ्या विजयच्या वडिलांच्या हाती मात्र निराशा आली आणि त्यांनी दिग्दर्शनाकडे पाठ फिरवली.
-
पण फ्लॉप दिग्दर्शकाच्या मुलाने मेहनत करत सुपरस्टार ही पदवी मिळवली.
-
अगदी लहानपणापासूनच विजयला अभिनयक्षेत्राची आवड होती.
-
सुरुवातीपासूनच विजयचा स्वभाव फटकळ असल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला राउडी हे टोपणनाव ठेवलं. त्याचे चाहते देखील त्याला आता याच नावाने ओळखतात.
-
राउडी वेअर नावाचा त्याने कपड्यांचा एक ब्रँड देखील सुरु केला आहे.
-
‘नुविल्ला’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही.
-
त्यानंतर २०१२ मध्ये ‘लाइफ इज ब्युटीफुल’ चित्रपटामध्ये त्याने अगदी छोटीशी भूमिका साकारली होती.
-
काही चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केल्यानंतर २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पेली चोपुलु’ या चित्रपटामध्ये त्याला मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली.
-
या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट तेलुगू फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तसेच या चित्रपटामधील विजयच्या भूमिकेचं देखील भरपूर कौतुक झालं.
-
२०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाने त्याचं नशिबच बदलंल.
-
या चित्रपटानंतर त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली. विजयने ‘नोटा’, ‘डिअर कामरेड’, ‘मेहनती’ आणि ‘वर्ल्ड फेमस लवर’ सारख्या चित्रपटांमध्ये ही काम केलं आहे.
-
हिल एंटरटेन्मेंट नावाची प्रॉडक्शन कंपनी देखील त्याने सुरु केली आहे. (फोटो – फाईल फोटो, इन्स्टाग्राम)

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल