
Sonakshi Sinha Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अचानक इन्स्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत, ज्यानंतर तिचा ट्रेंड सुरू झाला आहे. वास्तविक सोनाक्षीने शेअर केलेले फोटो पाहून सोनाक्षी सिन्हाचा साखरपुडा झाल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये ती एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे पण तिने तिचा पार्टनर कोण आहे हे सांगितलेले नाही.

सोनाक्षी सिन्हाने हे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती साखरपुड्याची अंगठी फ्लॉंट करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये, सोनाक्षी तिच्या होणाऱ्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले की, आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण माझे एक स्वप्न पूर्ण होणार आहे.

या फोटोमध्ये सोनाक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हात पकडलेला दिसत आहे. ‘नोटबुक’ चित्रपटाचा अभिनेता झहीर इक्बालसोबत सोनाक्षीने साखरपुडा केल्याची चर्चा आहे.

सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंनी कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सोनाक्षीची जोडीदार कोण होणार हे अजून पाहायचे आहे.

सोनाक्षीचे हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे. फोटो पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटीही तिच्या पोस्टवर कमेन्ट करत आहेत.

सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

आतापर्यंत ती ‘दबंग’, ‘राउडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग 2’, ‘हॉलिडे’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.