
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाद्वारे २०१७ ची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिट ५३ सेकेंदाचा आहे. या ट्रेलरची सुरुवात १२ व्या शतकापासून सुरु होते.

काही प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर ट्रेलरविषयी भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसत आहे.

‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत की हा लूक अक्षयच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाची आठवण करून देतो.

यामध्ये असलेल्या अक्षय कुमारचा लूक नेटीझन्सना ‘बाला’ची आठवण करून देत आहे.

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सोशल मीडियावर ‘पृथ्वीराज’वरील मीम्स चांगलेच व्हायरल होत आहेत.

‘पृथ्वीराज’ ३ जून रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे.

(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)