
अभिनेता अर्जुन कपूरचा बदलता लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

वजन कमी करणं त्याच्यासाठी किती कठीण होतं हे अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

जवळपास वर्षभर वजन कमी करण्यासाठी अर्जुन मेहनत घेत होता.

त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी वजन कमी केलं असल्याचं बोललं जातंय.

अर्जुनने फेब्रुवारी २०२१ आणि मे २०२२मधला स्वतःचा फोटो शेअर करत दोघांमधील फरक काय आहे हे सांगितलं आहे.

१५ महिने सातत्याने एका गोष्टीवर काम करून मी वजन कमी केलं आहे हे मला स्वतःलाच खरं वाटत नाही असं अर्जुनचं म्हणणं आहे.

अजूनही मला माझ्या बॉडीवर खूप मेहनत घ्यायची आहे असं अर्जुन म्हणतो.

वजन वाढल्यानंतर अर्जुनला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

पण आता मेहनत करून त्याने ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)