
सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतल्याने अनेक चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

सोहेल-सीमाला दोन मुलं सुद्धा आहेत.

सीमाचा लूक पाहता ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारी दिसते.

फॅशन डिझायनर म्हणून काम पाहणारी सीमा सोशल मीडियाद्वारे तिचे हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तिचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स देखील आहेत.

मात्र सोहेल-सीमा घटस्फोट घेणार म्हटल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

या दोघांच्या नात्यामध्ये नेमकं काय बिनसलं हे अद्याप स्पष्ट नाही.

खान कुटुंबियांनी देखील त्यांच्या घटस्फोटाबाबत मौन पाळणंच पसंत केलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)