
सध्या देशभरात दाक्षिणात्य विरुद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत असली तरी बॉलिवूडमध्ये काही दिग्दर्शक असेही आहेत. ज्यांनी सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आज हे दिग्दर्शक कोट्यवधीच्या संपतीचे मालक आहेत.

‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला- रामलीला’, ‘गुजारिश’ आणि ‘गंगूबाई काठियावाड़ी’ यांसारखे हिट चित्रपट देणारे संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाचे सेट हे नेहमीच विशेष आकर्षण ठरतं.

उत्तम कथा, संवाद आणि भव्य सेटसाठी प्रसिद्ध असलेले भन्साळी हे बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. एका रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपती ९४० कोटी रुपये एवढी आहे.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘पीके’, ‘संजू’, आणि ‘३ इडियट्स’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सध्या ते त्यांचा आगामी चित्रपट ‘डंकी’मुळे चर्चेत आहेत.

राजकुमार हिरानी देशातील सर्वात जास्त कर भरणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती १३०० कोटी रुपये एवढी आहे.

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये एंट्री देण्यासाठी ओळखला जातो. DDLJ, ‘कल हो न हो’, ‘माय नाम इज खान’ सारखे हीट चित्रपट देणाऱ्या करणनं ‘स्टूडेंट ऑफ द ईयर २’ आणि ‘कलंक’ बिग बजेट फ्लॉप चित्रपटही दिले आहेत.

बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या करण जोहरची एकूण संपती २०५ मिलियन डॉलर आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न हे १०० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

‘गैंग्स ऑफ वासेपुर’, ‘गेम ओवर’, ‘मनमर्जियां’, ‘ब्लैक फ्राइडे’ यांसारखे धमाकेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांमध्ये गणला जातो.

अनुराग कश्यप तब्बल ८५० कोटींच्या संपत्तीचा मालक असून त्याचा हैदराबादमध्ये एक लग्जरी बंगला आहे ज्याची किंमत जवळपास ६ कोटी रुपये आहे. अनुराग एक उत्तम दिग्दर्शकच नाही तर उत्तम लेखक देखील आहे.

बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांच्या यादीतील एकमेव महिला दिग्दर्शक आहे मेघना गुलजार. ‘राजी’ आणि ‘छपाक’ सारख्या स्त्रीप्रधान चित्रपटांना प्राधान्य देणाऱ्या मेघना गुलजार त्यांच्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखल्या जातात.

आपली बॉलिवूड कारकिर्दीत मोजकेच चित्रपट देणाऱ्या मेघना गुलजार या तब्बल ८३० कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. याशिवाय त्या निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहेत.

‘बजरंगी भाईजान’ आणि ‘टाइगर जिंदा है’ सारखे हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक कबीर खानचा ‘८३’ चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मात्र तो फारसा चालला नाही.

आपल्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखला जाणारा कबीर खान ३०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. दिग्दर्शकासोबतच तो एक स्क्रिनरायटर आणि सिनेमॅटोग्राफर देखील आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या स्टंट आणि अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहितनं ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘सिंघम’, ‘गोलमाल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडच्या श्रीमंत दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या रोहित शेट्टीची एकूण संपत्ती २९० कोटी रुपये आहे.