
मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नाव आवर्जून घेतलं जातं.

तिच्या बोल्ड अन् ग्लॅमरस लूकचे हजारो चाहते आहेत.

आता ती ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिजमध्येही दिसणार आहे.

या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

यामध्ये तेजस्विनीचा बोल्ड लूक पाहायला मिळाला.

हा मराठीमधील सगळ्या बोल्ड टीझर असल्याचं बोललं जात आहे.

रानबाजार या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या सीरिजचा विषय हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे.

तेजस्विनीचा कधी न पाहिलेला लूक यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तेजस्विनीने यापूर्वी बोल्ड लूकमध्ये बऱ्याचदा फोटोशूट केलं.

पण ‘रानबाजार’ सारख्या सीरिजमध्ये काम करण्याचा तिने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सध्या सोशल मीडियावरही तेजस्विनी चर्चेचा विषय ठरत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)