
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकताच श्रुतीचा ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटात श्रुतीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
या फोटो गॅलरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत श्रुती मराठेच्या पती बद्दल.
‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली श्रुती मराठे ४ डिसेंबर २०१६ रोजी विवाहबंधनात अडकली.
श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्नगाठ बांधली.
‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटवर झालेली त्यांची ओळख कालांतराने मैत्रीत रुपांतरित झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत लोकप्रिय झाला.
मास मीडिया केलेल्या गौरवचे आयुष्य दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यामुळे बदलले.
व्हिसलिंग वूडमध्ये नसीरुद्दीन शाह हे त्याचे शिक्षक होते.
त्यांच्याकडे शिकत असतानाच अभिनय क्षेत्रामध्ये करियर करण्याचा गौरवचा निर्णय पक्का झाला.
गौरवने अनेक यशस्वी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या निर्मिती अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘काय रे रास्कला’ या चित्रपटात गौरव झळकला आहे.
अभिनयासोबतच गौरव फिटनेसलाही सर्वाधिक महत्त्व देतो.
अभिनेत्री श्रुती मराठे लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात झळकणार आहे.
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे / इन्स्टाग्राम)