
अभिनेता गश्मीर महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जातो.

गश्मीर प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे.

‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटातून गश्मीरने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

‘देऊळबंद’, ‘कान्हा’, ‘वन वे टीकेट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘धर्मवीर’ या चित्रपटातून गश्मीरने अभिनयाची छाप पाडत चित्रपटसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलं.

मराठीसोबतच गश्मीरने बॉलिवूड चित्रपटांतही काम केलं आहे.

‘डोंगरी का राजा’, ‘पानिपत’ या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

अभिनयासोबतच पिळदार शरीरयष्टी आणि फिटनेससाठी गश्मीर ओळखला जातो.

तरुणींच्या मनावर मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याची पत्नीही अतिशय सुंदर आहे.

गश्मीरच्या पत्नीचं नाव गौरी असं असून ती कलाविश्वापासून दूर आहे.

गश्मीरने २०१४ मध्ये गौरीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा देखील आहे.

गश्मीर पत्नी आणि फॅमिलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

लवकरच गश्मीर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार आहे.

या चित्रपटात गश्मीर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.

(सर्व फोटो : गश्मीर महाजनी/ इन्स्टाग्राम)