
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
अपूर्वा सध्या आईसोबत दुबई फिरायला गेली आहे.
अपूर्वाला भटकंतीची प्रंचड आवड आहे.
‘दुबई ट्रिप’चे अनेक फोटो अपूर्वाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
युनाईटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई.
दुबईतील संस्कृती प्रामुख्याने इस्लाम आणि पारंपरिक अरब संस्कृतीभोवतीच गुंफली गेली आहे.
दुबईचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रशस्त मॉल्स आणि उंचच उंच इमारती.
जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणारी बुर्ज खलिफा ही इमारत सध्या दुबईच्या पर्यटनाचे केंद्र बनली आहे.
अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
(सर्व फोटो सौजन्य – अपूर्वा नेमळेकर / इन्स्टाग्राम)